नवी दिल्ली: भारत सरकारने जुलै 2020 मध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण मंजूर केले होते. त्यांनतर सध्या देशभरात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या ऐरणीवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना एक आदर्श शिकण प्रणाली मिळणे गरजेचे आहे.
गुरुवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी या नवीन शिक्षण धोरण राबविण्याशी संबंधित शाळांमध्ये पूर्ण कृती आराखडा जाहीर केला. यामध्ये शिक्षण विभागाकडून यासह, या धोरणाची प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘सार्थक’ हे अँप पण लाँच केले गेले आहे. हे अँप पॉलिसीच्या अंमलबजावणीशी संबंधित विषयांवर राज्यांमधील पूल म्हणून काम करेल. तसेच, त्यांच्या अंमलबजावणीवर देखील लक्ष ठेवेल.
यामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्थानिक संदर्भ आणि गरजा असतील त्यानुसार आवश्यक ते महत्त्वपूर्ण बदल करू शकतात. शाळांशी संबंधित ही योजना 10 वर्षांची आहे. यावेळी निशंक म्हणाले की हे अँप शाळांमध्ये नवीन शिक्षण धोरण राबविण्याचे कागदपत्र आहे. हे विविध युजर्सकडून प्राप्त झालेल्या इनपुट आणि अभिप्रायाच्या आधारे वेळोवेळी अपडेट केले जाऊ शकते. याआधी 1986 मध्ये शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सहा वर्षे लागली होती. त्यामुळे आता हे नवीन शैक्षणिक धोरण कधी आमलात येते याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा रीशेड्यूल केल्या पाहिजेत’
- गिरीश बापट यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेवून केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पंढरपुरातील ‘त्या’ सभेच्या आयोजकांवर अखेर गुन्हा झाला दाखल
- ‘भिडेंनी वैज्ञानिक, डॉक्टरांचा अपमान केलाय,त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

