जिनिव्हा : सध्या जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. यामध्ये या लाटेमध्ये नागरिकांच्या हातात निदान कोरोना लस हा प्रतिबंधक उपाय तरी आहे. यामध्ये भारतातील पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
मात्र सध्या अनेक देशांमध्ये वितरित होत असलेल्या सिरम च्या या लसीच शेल्फ लाइफची केवळ 6 महिने आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटने WHO कडे वॅक्सीन शेल्फ लाइफची मुदत 6 महिन्यांहून 9 महिन्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. मात्र सिरमने केलेल्या मागणीसाठी पुरेसा डेटा नसल्याचे सांगत WHO ने ही मागणी फेटाळून लावली आहे.
WHO ने या मुद्यावर चर्चा करण्यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया सोबत बैठक घेण्याची मागणी केली आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्यावतीने एस्ट्राजेनकाच्या लशीचे उत्पादन केले जाते. तर भारतात ही लस कोविशिल्ड या नावाने उपलब्ध आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोविशिल्डच्या शेल्फ लाइफ यापूर्वीच 9 महिन्यांची केली आहे. शेल्फ लाइफ म्हणजे लशीच्या उत्पादनापासून त्याचा वापर होण्याच्या शेवटच्या तारखेला शेल्फ लाइफ म्हटले जाते. सामान्य भाषेत त्याला एक्सपायरी डेट म्हणतात. हा कालावधी उलटून गेल्यानंतर लशीचा वापर करता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- यम है हम! जालनावासियांना घरी बसवण्यासाठी यमराज आले रस्त्यावर
- भारतातील ‘ या ‘ शहरांमध्ये असतील टेस्ला कारचे शोरुम
- ‘बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा रीशेड्यूल केल्या पाहिजेत’
- सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने रोहित शर्माविषयी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

