🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवार आणि रविवार रोजी पूर्णतः लॉकडाऊन जाहीर केले आहे. याची अमलबजावणी करण्यासाठी स्वतः वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहे. या लॉकडाऊन मध्ये औद्योगिक परिसर, बांधकाम व्यवसाय आदीसह इतर आस्थापने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु यांना परवानगी दिली असली तरी मात्र कामगारांनी कामापेक्षा आरोग्याला महत्व देत उत्स्फूर्तपणे लॉकडाऊन पाळला असल्याचे पाहायला मिळाले.
एरवी सकाळपासून संध्याकाळपर्यंत गजबजून जाणारा कामगार चौक आज मात्र सकाळपासूनच शांत होता. नेहमी शेकडो कामगार याठिकाणी हातात डबा घेऊन काम मिळण्याची वाट पाहत असतात. तर ज्यांना कामागार हवे आहे ते ही याठिकाणी येऊन कामगारांना घेऊन जातात. मात्र शनिवारी सकाळपासूनच याठिकाणी ना कामावर नेण्यासाठी कोणी येत होते, न कामावर जाण्यासाठी कोणी उभे दिसले. त्यामुळे पोटापेक्षा कामगारांनी आरोग्याला महत्व दिल्याचे पाहायला मिळाले.
या लॉकडाऊन मुळे रोज दिवसभर काम करून संध्याकाळी मिळालेल्या पैशातून घर चालवणाऱ्यांची परवड झाली आहे. कित्येक दिवस अनेकांना रोजगार मिळत नाही. अशा वेळेस एखाद्या दिवशी हाताला लागणारे कामही या लॉकडाऊन मुळे मिळत नसेल तर घर चालवायचे कसे? आरोग्याची काळजी असली तरी प्रशासनाने देखील पोटाचा विचार करावा, अशी मागणी कामगार करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- घाम पुसण्यासाठी मास्क खाली केला तरी होतोय दंड!
- कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या पथकालाच ठोठावला दंड!
- आंदोलन, वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडेंचा ‘वैद्यनाथ’ पुन्हा सुरू
- आरोपीसोबत मद्यपार्टी भोवली; सहायक उपनिरीक्षकासह दोघे निलंबित
- ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री मंगळवारी संबोधित करणार’


