Share

घाम पुसण्यासाठी मास्क खाली केला तरी होतोय दंड!

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : केवळ घाम पुसण्यासाठी मास्क खाली घेतला तरी दंडाची पावती आकारत असल्याचा प्रकार सोलापूर येथे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.दुकानात एकटा असला तरी मास्क आवश्यक आहे का? व्यापार करायचा की दंड भरत बसायचे? असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी केला आहे. यंत्रणेने दुकानात घुसून कारवाई सुरू केल्याचा निषेध करण्यासाठी दुपारी दुकाने बंद केली. दरम्यान, होत असलेली कारवाई नियमानुसारच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोलापूर शहरातील चाटी गल्ली येथे पोलिसांच्या पथकाने अचानक कारवाई सुरू केली. नियमांचे उल्लंघन केले म्हणून पाचशे ते दोन हजार रुपये दंडाच्या पावत्या फाडू लागले. त्याला विरोध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी पटापट दुकाने बंद केली. पाहता पाहता टेलिफोन भवनपासून कुंभार वेसपर्यंत सर्व दुकाने दुतर्फा बंद झाली. त्यानंतर एकवटलेल्या व्यापाऱ्यांनी माध्यमांसमोर गाऱ्हाणे मांडले. आधीच कोरोनामुळे व्यापारपेठेत मंदी आहे. त्याचा सामना करत व्यापारी दुकाने उघडत आहेत.

दुपारच्या वेळी ग्राहक फिरकतदेखील नाहीत. अशा वेळी काही जण दुकानात थेट येतात. मास्क खाली आल्याचा फोटो काढतात. दंड भरण्यास सांगतात. व्यापार नसताना दोन हजार रुपयांचा दंड आणणार कोठून? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी विचारला आहे. कोरोनाला रोखणारे सर्व उपाय करून नियम पाळत आहेत. परंतु यंत्रणा ‘टारगेट’ पूर्ण करण्यासाठी व्यापारपेठेतच चकरा मारत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. साधे पाणीही प्यायचे नाही का? हा कसला जुलूम आहे? अशा शब्दांत त्यांनी गाऱ्हाणी मांडली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!