Share

कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या पथकालाच ठोठावला दंड!

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाला झुगारून एका वाहनाने व्यावसायिकावर कारवाई करण्यासाठी निघालेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या पथकाला पाचशे रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई जळगाव जामोद येथे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास येथील पालिकेच्या पथकातील सात कर्मचारी बोलेरो वाहनात बसून दुकान बंद करण्याच्या सूचना करत होते. या बाबतची माहिती मिळताच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे यांनी त्यांना पकडले. त्यांना जमावबंदी आदेश लागू असताना तुम्ही सहा ते सात कर्मचारी कसे काय फिरता अशी विचारणा केली. परंतु कर्मचाऱ्यांनी समर्पक उत्तर दिले नाही. त्यामुळे वानखडे यांनी या घटनेची माहिती तहसीलदार व ठाणेदार यांना दिली.

परंतु तहसीलदार व ठाणेदारांनी कार्यवाही करण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे पोलीस ठाण्यात शहरातील व्यापारी व नागरिक जमा झाले. अखेर कर्मचाऱ्यांनी पाचशे रुपये दंडाची पावती फाडली. विशेष म्हणजे पावतीवर तारीखही टाकण्यात आली नव्हती. नियम समजावून सांगणाऱ्या पथकालाच दंड भरावा लागल्याने पालिकेची नाहक बदनामी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!