🕒 1 min read
बीड : परळीतील पांगरी येथील पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू झाला आहे. १९ महिन्यांचे वेतन न दिल्याने कर्मचाऱ्यांनी कारखाना बंद पाडला होता. मात्र, अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप करू, यात कसलाही अडथळा आता येऊ देणार नाहीत असा शब्द देत कर्मचारी युनियनने कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांच्यावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. बुधवारी सकाळी वैद्यनाथ कारखान्यावर गोंधळ उडाला होता. कारखान्या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याचे सांगितले गेले तर, गोंधळ करणारे कर्मचारी नव्हते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते असा आरोप भाजपने केला.
यासंदर्भात वैद्यनाथ कारखाना कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विष्णू तांबडे व उपाध्यक्ष बालासाहेब मुंडे यांनी कारखाना प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आम्ही सर्व वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना युनियन हे स्पष्ट करू इच्छितो की, आमची कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या ॲडव्हान्स बद्दल कारखान्याच्या व्यवस्थापनाशी चर्चा चालू होती. ही चर्चा सकारात्मक वळण घेत असतांना कांही लोकांनी यामध्ये हस्तक्षेप व मुजोरी करून कारखाना बंद पाडला आणि यामुळे १९ महिन्याचे पगार रखडले अशी चर्चा झाली.
परंतू कारखाना सुरू होऊन चारच महिने झालेले आहेत, आणि मागील वर्षी कारखाना ऊसा अभावी बंद होता. आमची व्यवस्थापनाशी चर्चा संपूर्ण होऊन आम्हाला हवी असलेली मागणी मान्य झालेली आहे. वैद्यनाथ कारखाना हा आमचा परिवार असून कारखान्याची नाहक बदनामी झाली याबद्दल आम्हालाही वेदना होतात. कारखाना सुरळीत सुरू करून चालवू आणि शेतकऱ्यांचे हाल होऊ देणार नाहीत असे संघटनेने सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोपीसोबत मद्यपार्टी भोवली; सहायक उपनिरीक्षकासह दोघे निलंबित
- महात्मा फुलेंच्या जीवनावर येणार चित्रपट; अजय-अतुल यांचे संगीत
- परभणीमध्ये दारुच्या चोरट्या वाहतूकीसह रेतीचा टिप्पर पकडला
- २० वर्षांपासून प्रलंबित रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार?
- ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री मंगळवारी संबोधित करणार’


