Share

आरोपीसोबत मद्यपार्टी भोवली; सहायक उपनिरीक्षकासह दोघे निलंबित

Published On: 

🕒 1 min read

बीड : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एका आरोपीला २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. पण त्याल्या न्यायालयातून कारागृहात घेऊन जाण्यापूर्वी सोबत घेत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका बारमध्ये पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री घडला होता. याप्रकरणी शुक्रवारी पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी एक सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि एक पोलिस नाईक यांना निलंबित केले.

बीड तालुक्यातील एका गावात मूकबधिर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी तुकाराम कुडूक याला मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा ठोठावली होती. विशेष म्हणजे पीडिता मूकबधिर असल्याने दुभाषाच्या मदतीने न्यायालयाने तिची साक्ष नोंदवून हा निकाल दिला होता. दरम्यान, शिक्षा झालेल्या आरोपीला न्यायालयातून जिल्हा कारागृहात नेण्यापूर्वी त्याला घेऊन आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका बारमध्ये जाऊन मद्यपार्टी केल्याची बाब समोर आली होती.

याप्रकरणी एसपी राजा यांनी चौकशीचे आदेश दिले होते. शुक्रवारी याप्रकरणी राजा यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक एन. डी. धनवडे आणि पोलिस नाईक एस. डी. गर्जे यांना सेवेतून निलंबित केले. दरम्यान, या प्रकरणात निलंबित झालेला पोलिस नाईक एस. डी. गर्जे हा वादग्रस्तच असून यापूर्वीही शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना एका प्रकरणात त्याचा निष्काळजीपणा भोवल्याने तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी त्याला निलंबित केले होते. आता पुन्हा तो निलंबित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!