जयपूर: सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहत आहेत. यामध्ये खेळाडू, कलाकार आणि राजकारणी देखील मागे नाहीत. आता हरियाणामधील कॉंग्रेसचे युवा नेते भव्य बिश्नोई आणि अभिनेत्री अनुक्षका शर्मा स्टारर ‘फिल्लौरी’ चित्रपटाच्या माध्यामातून अभिनेत्री मेहरीन पीरजादा हे विवाह बंधनात अडकणार आहेत. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला.
भव्य बिश्नोई हे माजी खासदार कुलदीप बिश्नोई यांचे पुत्र आणि हरियाणामधील कॉंग्रेसचे युवा नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हिसार येथून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. ते लोकहितार्थ विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पदवी घेतली असून त्यांनी हरियाणामधील विविध नागरी आणि सामाजिक संस्थांमध्ये काम केले आहे. हिसार मतदारसंघाचे त्यांचे आजोबा भजन लाल यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले. २०११ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा कुलदीप बिश्नोई यांनी हिसार लोकसभा जागा जिंकली. 2014 मध्ये जागा जिंकण्यात अयशस्वी राहिले.

जयपूरमध्ये मोठ्या थाटात हा साखरपुडा सोहळा पार पडला आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या साखपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत. मेहरीनने देखील काही फोटो तिच्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. या साखरपुड्यात त्यांचे कुटुंबिय, मित्र परिवार देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- बँकांच्या खासगीकरणावर आरबीआयच्या माजी गव्हर्नर राजन यांनी केली चिंता व्यक्त
- बॉयफ्रेंड रणबीरला सोडून आलिया सेलेब्रेशनमध्ये दंग
- कृषी विभागाच्या योजनेवर ग्रामस्थांचा बहिष्कार
- उतावीळ नवरदेवाकडून खंडणी वसुल करणारी टोळी गजाआड
- श्रियाचा मनमोहक अंदाज, पहा फोटो

