नांदेड : कंधार तालुक्यातील सावरगाव येथील गावात नानासाहेब कृषी संजीवनी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. पण या प्रकाराला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. कृषी योजना राबवित असताना या योजनेत कृषी सहाय्यक हस्तक्षेप करीत या योजनेचा फायदा काही विशिष्ट लोकांना होण्याची शक्यता वर्तवत. ही योजना राबवण्याअगोदर कृषी सहाय्य्कांची बदली करा अशी मागणी केली जात आहे.
सावरगाव गाव येथे गेल्या तीन वर्षांपासून कृषी सहायक रुजू आहेत. त्यांचा काळात त्यांनी गावाच्या विकासासाठी कुठलीच योजना आणली नाही. त्यामुळे गावाचा विकास खुंटला आहे. मागील काही दिवसांपासून सरपंच आणि इतर गावकऱ्यांनी ही कृषी योजना आणली. आता या योजनेत गावकऱ्यांना समान लाभ भेटावा त्यांचा विकास व्हावा. ही अपेक्षा आहे पण कृषी अधिकारी या योजनेचा लाभ सर्वांना मिळू देणार नाही. अशी शक्यता गावकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कृषी सहाय्यक गाव पातळीच्या राजकारणात सामील होत. गावकऱ्यांना योजनेचा लाभ होऊ देत नाही. त्यामुळे कृषी सहाय्यकांना लवकरात लवकर बदली करून कृषी योजना राबवावी. अन्यथा संपूर्ण ग्रामस्थान या योजनेवर बहिष्कार टाकतील असे गावातील सरपंच व इतर ग्रामस्थांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विजयानंतर मायकल वॉनची भारतीय संघाची या संघासोबत तुलना!
- जालन्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज होणार निर्णय
- विराटची नाबाद खेळी ; ‘या’ खेळाडूने दिला होता कानमंत्र
- रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली
- दोन दिवसात संपलेल्या कसोटी सामन्यावर आयसीसीचा रीपोर्ट प्राप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

