🕒 1 min read
बीड : जे वंचित आहेत त्यांनाच वंचितांच्या वेदना माहित आहेत. पण, सध्या सर्वत्र गृहीत धरले जात असल्याने ओबीसींना ताकद दाखवावी लागेल. दिल्लीत महिनाभर तळ ठोकून बसण्याची तयारी ठेवावी लागेल. ओबीसी समाज गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्कासाठी संघर्ष करत आहे. आता ‘जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा,’ असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
बीड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आयोजित जिल्हा अधिवेशन व ओबीसी, व्हीजेएनटी यांच्या आरक्षण बचाव निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. संस्थापक बबनराव तायवाडे, माजी आमदार नारायण मुंडे, शफी अन्सारी, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आदी उपस्थित होते
मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, अनेकजण सत्तेत येण्यासाठी ओबीसींचा आधार घेतात; पण मला आयुष्यात काही स्वत:साठी मिळवायचं नाही. मी आधी सत्तेत आहे आणि या सत्तेचा वापर ओबीसींच्या न्याय हक्कासाठी करीत आहे. ते म्हणाले, १२७ वी घटनादुरुस्ती केली, पण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंतच ठेवली. त्यामुळे ओबीसींमध्ये इतरांना सामावून घेऊन आरक्षण देता येणार नाही. मंडळ आयोग हिंदूविरोधी असल्याचे सांगितले गेले व आपसात लढण्यात वेळ गेला. यातून काय साध्य झाले, वंचित, उपेक्षित घटकांतील लोकांच्या न्याय्य-हक्कांसाठी लढण्यासाठी आपण पहाड बनून उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ओबीसी, व्हीजेएनटी समाजातील समाजातील लोक आजही गुलामगिरीचे जीवन जगत आहेत. ओबीसी समाजाचा बुलंद आवाज दिवंगत गोपीनाथराव मुंडे असोत की, मंत्री छगनराव भुजबळ असोत त्यांच्यापासून ते सर्वसामान्य ओबीसी समाजातील नागरिकांपर्यंत संघर्ष सुरूच आहे. बहुरूपी पोलिसांच्या अंगावर खरा पोशाख चढत नाही, जोपर्यंत वासुदेवाचं रूप घेऊन दारोदारी फिरणाऱ्या वासुदेवाचे घर स्लॅबचे होत नाही. जोपर्यंत वाडी तांड्यावरील नागरिकांना पक्के छत मिळत नाही तोपर्यंत ओबीसीचा हा संघर्ष लढा चालूच राहणार आहे. या लढ्यामध्ये आता ओबीसी समाजबांधवांनी जागरूक होऊन आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील पोलीस खात्याला गृहमंत्र्यांनी वेगळे काही काम दिले आहे का?’, भाजपाचा सवाल
- ‘आदित्यला लग्नासाठी मुलगीही मोदी सरकारने द्यावी, वऱ्हाडींचा खर्चही उचलावा’, निलेश राणेंचा खोचक टोला
- काँग्रेसच्या नेत्याकडून चक्क भाजप उमेदवाराचा प्रचार, काँग्रेसमध्ये खळबळ
- …नाहीतर भाजपसारख्या पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच ओवैसींकडे पाहिलं जाईल- संजय राऊत
- मुस्लिमांची अवस्था वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी- असदुद्दीन ओवैसी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
