Share

महाराष्ट्रातील पोलीस खात्याला गृहमंत्र्यांनी वेगळे काही काम दिले आहे का?’, भाजपाचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : उत्तरप्रदेश दहशतवादविरोधी पथकाने रविवारी नाशिकमधील आनंद नगर येथून अतिफ उर्फ कुणाल चौधरी याला अटक केली आहे. अतिफच्या खात्यात बाहेर देशातून कोट्यावधी रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्र पोलीस व एटीएसवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांना याचा सुगावाही लागला नाही, महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला गृहमंत्र्यांनी वेगळे काही काम दिलेले आहे का? असा प्रश्न उपस्थित करत भातखळकरांनी पोलिसांवर निशाना साधला आहे.

उत्तर प्रदेश एटीएस पथकाने नाशिकमधील धर्मांतरण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नाशिकमधून एकाला हे रॅकेट चालवताना एटीएस पथकाने अटक केली. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्र पोलिसांवर कठोर शब्दात टिका केली आहे. अतुल भातखळकर म्हणाले, ‘धर्मांतराचं रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली नाशिकमधून उत्तर प्रदेश एटीएसने कुणाल म्हणून वास्तव्यास असलेल्या अतिफला बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्राच्या एटीएसला याचा सुगावाही लागू नये हे आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला गृहमंत्र्यांनी वेगळे काही काम दिलेले आहे का?’ ट्विटरवर असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र पोलिसांवर त्यांनी निशाना साधला आहे.

दरम्यान यापूर्वीही उत्तर प्रदेश एटीएसने नागपूरमध्ये धर्मांतर रॅकेट चालविणाऱ्यांना अटक केली होती. मूकबधीर विद्यार्थी आणि गरीब नागरिकांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावून त्यांना परदेशातून आलेले पैसे देण्यात आल्याचे उघड झाले होते. यावेळी तीन जणांना उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली होती. प्रसाद रामेश्वर कांबळे, कौसर आलम शोकत अली खान व भूप्रियबंडो देवीदास मानकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

एटीएसने आरोपींकडून एक डायरीही जप्त केली होती. त्यात महाराष्ट्र, केरळ, हरयाणा, आंध्रप्रदेश व दिल्लीतील रॅकेटच्या सदस्यांची नावे होती. या आरोपींना पाकिस्तान गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ व अन्य इस्लामिक संस्थाकडून बेकायदा कृत्यांसाठी पैसे पुरवले जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी ईडी करत असून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत या आरोपींवर विविध कलमार्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!