🕒 1 min read
मुंबई : नक्षलावादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेत दिल्ली येथे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. नक्षलप्रभावीत राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. यावेळी नक्षलग्रस्त भागांमध्ये विकासकामांसाठी केंद्राने अधिक निधी उपलब्ध करावा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी नक्षलग्रस्त भागातील विकासासाठी १२०० कोटी रुपयांची मागणी केली. विकासकामे, नवीन पोलिस पोस्ट, नवीन शाळा आणि मोबाइल टॉवर उभारण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
या मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे. ‘प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारकडे मागण्याची सवय झाली आहे. आदित्यला लग्नासाठी स्थळही केंद्राने द्यावे असा खोचक टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारकडे मागण्याची सवय झाली आहे. आदित्यला लग्नासाठी स्थळ पाहिजे ते केंद्रांनी द्यावे, लागणारा खर्च पण द्यावा, जेवणाची जबाबदारी संबंधित विभागाकडे द्यावी, आमच्या कर्ट्याला कोणी समोरून देणार नाही. आम्ही महाराष्ट्रात स्टेजवर उभे राहून फक्त दात दाखवायचं काम करू.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 27, 2021
प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारकडे मागण्याची सवय झाली आहे. आदित्यला लग्नासाठी स्थळ पाहिजे ते केंद्रांनी द्यावे, लागणारा खर्च पण द्यावा, जेवणाची जबाबदारी संबंधित विभागाकडे द्यावी, आमच्या कार्ट्याला कोणी समोरून देणार नाही. आम्ही महाराष्ट्रात स्टेजवर उभे राहून फक्त दात दाखवायचं काम करू या शब्दांत ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवार खिशात घेवून फिरतात असे वक्तव्य केले होते. यावर संजय राऊत यांनी पलटवार करत ‘पहाटेच्या शपथविधीनंतर एकमेव अजित पवार ७२ तासांत भाजपच्या खिशातून सटकले. 100 अजित पवार भाजपला कसे झेपणार?’ अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता भाजप नेते निलेश राणे यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संज्या पवार कुटुंबाची किती चाटूगिरी करणार, जिभेला आराम दे. चंद्रकांतदादांनी अजित पवारांबद्दल केलेलं वक्तव्य इतकं झोबलं की दोन दिवस संज्या त्यावरच बोलतोय. संज्या ते पवार कुटुंब आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील’ असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब’
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
