Share

…नाहीतर भाजपसारख्या पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच ओवैसींकडे पाहिलं जाईल- संजय राऊत

Published On: 

मुंबई : एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी ‘मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे मुस्लिमांना आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं. आता मुस्लीम वाद्य वाजवणार नाहीत. प्रत्येक जातीकडेही त्यांचा नेता आहे, मात्र मुस्लिमांकडे त्यांचा नेता नाही. उत्तर प्रदेशात १९ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे, मात्र एकही नेता नाही’, अशी खंत व्यक्त केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात ओवैसींबाबत भाष्य केलं आहे.

मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

ओवेसी हे राष्ट्रभक्तच आहेत. बॅ. जिना यांच्यासारखे ते उच्चशिक्षित, कायदेपंडित आहेत, पण त्याच जिना यांनी राष्ट्रभक्तीचा बुरखा पांघरून ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा दिला. देशाची फाळणी हा कट होता आणि त्यामागे ब्रिटिशांची फोडा-झोडा आणि राज्य करा हीच नीती होती. आज ओवैसींच्या सभांमधून ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे उठत आहेत. त्यामागेही राजकीय सूत्र आहेच. फोडा, झोडा आणि विजय मिळवा. ओवेसी यांनाही त्याच विजयाचे सूत्रधार म्हणून वापरले जात आहे. पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपचे राजकारण पुढे सरकणार नाही का?, असा सवाल राऊतांनी सामनामधून केला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय काय पाहावे लागेल, घडवले जाईल ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवैसी व त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचे दिसत आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!