तुळजापूर – कोरोना पार्श्वभूमीवर सोमवार दि २६ एप्रिल रोजी तुळजाभवानी मातेचा चैञी पोर्णिमेचा सोहळा भाविकांविना मंहत पुजारी सेवकरी कर्मचारी अदि मोजक्याच मंडळी चा उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला. चैञी पोर्णिमा दिनी मंदीर व मंदीर परिसर भाविकांविना शुकशुकाट जाणवत होता.
श्रीतुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा झाल्यानंतर आई भवानी देशावरील कोरोना चे संकट दूर कर असे साकडे मंहत पुजारी यांनी चैञी पोर्णिमा दिनी देवीला घातले. सोमवार दि २६ पहाटे चरणतिर्थ करण्यात येवुन मंदीर खुले करण्यात आले. सकाळी सहा वाजता देविजींना अभिषेक करण्यात आल्यानंतर नंतर देवीजींना वस्ञोलंकार घालण्यात आले. यानंतर नित्योपचार पुजा करण्यात आली
सायंकाळी सात वाजता पुनश्च देविजींना दुग्धअभिषेक करून नंतर वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर नित्योपचार होवुन देविजींचा प्रांगणात छबिना काढण्यात आला. त्या नंतर मंहत वाकोजीबुवा गुरुतु कोजीबुवा यांनी प्रक्षाळपुजा केली. यानंतर मंदीर प्रांगणात श्रीदत्त मंदीरा समोर मंहत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा यांनी पोर्णिमा दिनाचा मानाचा उपरण्यात जोगवा मागितल्यानंतर चैञी पोर्णिमा धार्मिक विधीची सांगता झाली.
महत्वाच्या बातम्या
- हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पोलिसांनी केला हस्तगत
- भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ
- आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांनी लस पैसे देऊन घ्यावी – सचिन खरात
- आपली जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलणं ही आता महाराष्ट्र सरकारची ओळख झाली आहे – दानवे
- ऑक्सिजन प्लांटच्या कामासाठी एका नव्या पैशाचाही निधी मिळाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा झाला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

