मुंबई : येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. सलामीची लढत ही मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या संघादरम्यान चेन्नई येथे होणार आहे. दरवर्षी आयपीएल मध्ये नवनवीन विक्रम नोंदवीले जातात. यावर्षीच्या आयपीएलमध्ये काही विक्रम निश्चित घडण्याची दाट शक्यता आहे. हे जर घडले तर स्पर्धेत इतिहास घडविण्याची संधी काही खेळाडूंना आहे.
पहिला विक्रम नोंदविण्याची संधी आहे आरसीबीचा कर्णधार कोहलीला. कोहलीने या आयपीएलमध्ये जर १२२ धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये ६ हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरेल. तर आरसीबीचा दुसरा मुख्य फलंदाज एबी डिव्हीलीयर्सला आपल्या ५ हजार धावा पुर्ण करण्यासाठी केवळ १५१ धावा हव्या आहेत. हा टप्पा पार केला तर तो आयपीएलमध्ये पाचवा खेळाडू ठरेल ज्याने ५ हजार धावांचा टप्पा ओलांडला आसेल.
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने केवळ एक षटकार मारला तर आयपीएलमध्ये गेलचे ३५० षटकार पुर्ण होतील. अशी कामगीरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरेल. हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर दोन अर्धशतक झळकावताच आयपीएलमध्ये ५० अर्धशतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरेल. तर दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने फक्त ९ चौकार मारले तर आयपीएल स्पर्धेत ६०० चौकार मारणारा आयपीएलमधील पहिलाच खेळाडू ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- मंगल कार्यालय चालकांच्या डोक्याला मनपाचा ‘ताप’, आपल्याच आदेशाचा पालिकेला विसर!
- धक्कादायक! मुलीच्या बदनामीने मातेची आत्महत्या; चार जणांविरुध्द गुन्हा
- उद्योजकाची आठरा लाखाला फसवणूक; विदेशातून मागवले होते रॉ मटेरीअल
- आमदार अंबादास दानवे शिवसेनेच्या प्रक्तेपदी
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पालकमंत्र्यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
