Share

उद्योजकाची अठरा लाखाला फसवणूक; विदेशातून मागवले होते रॉ मटेरीअल

Published On: 

औरंगाबाद: एका उद्योजकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विदेशातून रॉ-मटेरीअल पाठवतो असे सांगत बनावट मेल आयडीच्या आधारे फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञाता विरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक देवळाणकर असे या उद्योजकाचे नाव असून त्याचं वाळूज एमआयडीसी येथे इलेक्ट्रिकल कंपनी आहे. या कंपनीला लागणारे रॉ-मटेरीअल दक्षिण कोरियातील आय.के. टेक कंपनीकडून मागवत असतात. हा कच्चा माल कंपनीच्या औरंगाबाद येथील प्रतिनिधी ज्युंग यांच्या माध्यमातून ते नेहमी मागवत असतात. त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर त्यांना त्यांनी मागवलेल्या मालाचे पैसे जमा करण्यासाठी एक मेल आला होता. देवळाणकर यांनी कंपनीच्या बँक खात्यावर २४५६७.७२ डॉलर (भारतीय चलनात १८ लाख २८ हजार ३१७ रुपये) ट्रान्स्फर केले. दोन दिवसांनी देवळाणकर यांनी कंपनीचे प्रतिनिधी ज्युंग यांना फोन करून पैसे पाठविले असून माल केव्हा येणार अशी विचारणा केली तेव्हा ज्युंग यांनी देवळाणकर यांना पेमेंट आमच्या कंपनीला मिळाले नसल्याचे सांगितले.

देवळाणकर यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता बँकेने पैसे पाठविल्याचे पुरावे दिले. देवळाणकर यांनी ज्युंग यांची भेट घेऊन त्यांना बँकेने दिलेली कागदपत्रे दाखविली असता त्यांनी तपासणी करून ते खाते आमच्या कंपनीचे नसल्याचे सांगितले. भामट्याने ज्युंग यांच्या मेल आयडीसारखाच दुसरा बनावट मेल आयडी तयार करून देवळाणकर यांनी पाठविलेले पैसे आपल्या खात्यात वळते केल्याचे समोर आले. देवळाणकर यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून या फसवणुकीची तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी चौकशी करून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. या प्रकरणी पुढील तपास दुय्यम पोलीस निरीक्षक पोतदार हे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!