Share

आमदार अंबादास दानवे शिवसेनेच्या प्रवक्तेपदी

Published On: 

औरंगाबाद : जालना – औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अंबादास दानवे यांची मराठवाड्यातून प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता अंबादास दानवेंची औरंगाबाद जिल्हामध्ये सरशी वाढली असल्याचे चित्र सद्यातरी पहावयास मिळत आहे.

दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीदरम्यान खुप मोठया प्रमाणात वादविवाद झाले. या वेळी शिवेसेनेचे दोन मंत्री, आमदार यांनी भाजप सोबत घरोबा केल्याने खैरे हे जाहीरपणे दानवेंना एकेरी भाषेमध्ये टीका केली होती. दरम्यान खैरे आणि दानवेंचे वादविवाद हे मातोश्रीला देखील माहिती आहेत. यामध्ये दुमत नाही.

परंतू दानवे यांनी जिल्हाप्रमुख झाल्यापासून पक्षांचा विस्तार ग्रामीण भागासह शहरात देखील मोठ्या प्रमाणात केला. याची दखल घेवून उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधानपरिषदेचे आमदार देखील केले. तर आमदार झाल्यानंतर देखील त्यांनी पक्षाच्या कामाला समान न्याय दिला. तसेच विधानपरिषदेमध्ये मराठवाड्यातील सिंचन, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी विधानपरिषदेमध्ये प्रश्न देखील उपस्थित केले. दानवेंनी गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या सर्व समावेशक प्रश्नावर चांगली मांडली करत प्रसार माध्यमासमोर अनेक वेळा मांडलेली आहे.

या वर विविध पातळीवरील त्यांचे काम, पक्षवाढीसाठी लागणारे नेतृत्व, लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांचा सामान्यामधील वावर या प्रत्येक विषयातील त्यांची असलेली जाण यांचा विचार करुन पक्षाने ही पुन्हा नव्याने दिलेली संधीचे ते कश्या प्रकारे न्याय देवू शकतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!