औरंगाबाद : कोरोना नियोजनानासाठी महानगरपालिकेत दररोज बैठकांचा सिलसिला सुरु आहे. कधी कॉन्टॅक्ट ट्रेकिंग, तर कधी कोविड सेंटर्स अशा एक ना हजार विषयांबाबत दररोज शेकडो आदेश निघत असतात. असाच एक निर्णय कोरोना रुग्णांना उपचार मिळावे यासाठी शहरांमध्ये अनेक मंगल कार्यालय ताब्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली होती. मात्र दररोज शेकडो निर्णय घेणाऱ्या मनपा प्रशासनालाच याचा विसर पडला आहे.
पहिल्या टप्प्यात ३१ मंगल कार्यालये ताब्यात घेण्यासाठी मंगल कार्यालय चालकांना पत्र पाठवण्यात आले होते. मात्र यापुढे महापालिकेने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे मंगल कार्यालय चालकांना हा वेगळाच ताप झाला आहे.
मागील काही दिवसांत जिल्ह्यात दररोज एक हजारपेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेतील उपलब्ध बेड्स कमी पडत आहेत. यावरून शहरात कोरोनाचा संसर्ग किती गतीने पसरत आहे, याची प्रचिती येते. त्यामुळे पालिका प्रशासनाने कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याची तयारी सुरू केली.
कोविड केअर सेंटरची संख्या आणि वाढते रुग्ण यांच्या मोठी तफावत निर्माण झाल्याने कोविड केअर सेंटरसाठी मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. यासाठी २५ मार्च रोजी मंगल कार्यालय चालकांना पत्र देण्यात आले. या पत्रात आम्ही आपले मंगल कार्यालय अधिग्रहित करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर यासाठी भाडे देणार का? किती देणार? सोयीसुविधा, साहित्य याबाबत कुठलेही ठोस निर्णय पालिका प्रशासनाने घेतले नाही.
अधिकारी पॉझिटिव्ह, नियोजन कोलमडले
मनपात अनेक अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यातच आरोग्य अधिकारी, शहर अभियंताच पॉझिटिव्ह आल्याने मंगल कार्यालयांबाबत कुठलाही ठोस निर्णय मनपाने घेतलेला नाही. पत्र देऊन आठवडा उलटला आता मनपा करणार तरी काय? असा प्रश्न मंगल कार्यालय चालक उपस्थित करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पालकमंत्र्यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
- ‘नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली पण ‘ती’ घोडचूक कधी सुधारणार ?’
- दोन हजाराची लाच मागणारा लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात!
- …म्हणून प्राजक्ता नंतर आता वीणा जगतापने सोडली ‘आई माझी काळुबाई’ मालिका
- कोरोना उपचार केंद्रांची संरचनात्मक व अग्निप्रतिबंधात्मक तपासणी; खाटांची संख्या वाढणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

