नांदेड : सध्या राज्यात आणि जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. समाजातून होणार त्रास ही याला कारणीभूत असल्याचे दिसून येते. अशीच एक घटना नांदेड येथे घडली. मुलीची दोनदा सोयरीक मोडून समाजात बदनामी झाल्याने मानसिक त्रासाला कंटाळून मुलीच्या आईस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या थेरबन येथील चौघाविरूध्द भोकर पोलिसात सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.मुलीची दोनदा सोयरीक मोडल्याने समाजात झालेल्या बदनामीमुळे राहत्या घरी कौशल्याबाई इरबाजी सुंकरवाड या महिलेने विषारी औषध प्राशन केले.
भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सदर महिलेस नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारा दरम्यान सदर महिलेची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी संतप्त जमावाने केली. हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणातून आपल्या समाजाचा खरा चेहेरा समोर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

