🕒 1 min read
नवी दिल्ली : कसोटी मालिकेत इंग्लंड संघावर दणदणीत विजय मिळाल्यानंतर इंग्लंड मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अवघ्या १२५ धावांचे माफक अव्हान इंग्लंडसंघाने २ गडी गमावून लक्ष्य गाठल. सोळाव्या षटकातच इंग्लंडने विजयी लक्ष्य गाठलं.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यांत भारतीय संघाने नाणेफेक गमावली. इंग्लडने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केल. सलामीवीर रोहितच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय फलंदाजी इंग्लंडच्या गोलंदाजी माऱ्यापुढं कोलमडली. श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये १२४ धावा केल्या. यामध्ये हार्दीक पांड्याची त्याला साथ मिळाली.
इंग्लंडच्या संघाने सावध खेळी करत २ गडी गमावत सोळाव्या षटकातच भारताचा दारुण पराभव केला. इंग्लंड संघाकडून जेसन रॉयने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर टी-२० क्रमवारीतील पहिल्या क्रमांकावरील डेवीड मलानने विजयी षटकार मारुन मालिकेतील इंग्लंडच्या पहिल्या विजयाची नोंद केली. टी-२० मालिकेची विजयी सुरुवात करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.
या सामन्यात भारताने खराब फलंदाजीचे प्रदर्शन केल्याने भारताला हा सामना गमवावा लागला. तसेच ज्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाचा दबदबा राहिला, त्या ठिकाणी विराट कोहलीने तीन फिरकीपट्टूंना खेळवण्याचा घाट घातला.
यामुळे भारतीय संघाला लाजिरवान्या पराभवाला सामोरे जावे लागले. म्हणून दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात काही बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे लेखामधून भारतीय संघात हे बदल केले जाऊ शकतात.
१. शिखर धवनच्या जागी रोहित शर्मा
पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या जागी शिखर धवनला संधी देऊन विराट कोहलीने सर्वांनाच बुचकाळ्यात टाकले होते .कारण रोहित सारख्या दिग्गज खेळाडूला बाहेर बसवने भारतीय संघाला चांगलेच महाग पडले. पहिल्या सामन्यात शिखर धवनला फक्त ४ धावा काढता आल्या.
२. भुवनेश्वर कुमारचे प्लेइंग इलेवनमध्ये पुनरागमन
प्रमुक वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात दुसऱ्या टी-२० सामन्यात पुनरागमन करु शकेल. आयपीएलच्या तेराव्या हंगामात त्याला दुखापत झाली होती.त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचा समावेश नव्हता. मात्र इंग्लडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याची निवड झाली आहे. परंतु पहिल्या टी-२० सामन्यात त्याला संधी दिली नाही. मात्र दुसऱ्या टी-२० सामन्यात एक फिरकीपटूला कमी करुन त्याच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी दिली जाऊ शकते .
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
