औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या कर्मचा-यांनी वाचवून जीवदान दिल्याची घटना सोमवारी दि.२४ घडली.
बाजारसांवगी येथील गट नं.११८ मधील राजु भानुदास नलावडे यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी कोल्हा पडल्याचे कळताच वनपरिक्षेत्र अधिकरी ए.आर.पेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कोटुरकर यांच्या उपस्थितीत वनरक्षक कुंटे, जाधव, वनमजुर दांडेकर आणि चव्हाण यांच्या मदतीने यशस्वीपणे बाहेर काढुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
पाण्याच्या शोधात सध्या वन्य जीव शहर अथवा गावाकडे आगेकूच करत असतात. विहिरीचा अंदाज न आल्याने कोल्हा विहिरीत पडला असल्याची शक्यता वन विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तवली. त्याबरोबर अशी घटना समोर आल्यास वन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले.
महत्त्वाच्या बातम्या
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आपली भूमिका-खा.संभाजीराजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

