हैदराबाद : देशात सध्या कोरोनाने थैमान घातले असून लसीकरण वाढवण्याची मागणी होत आहे. देशभरात लसीचा तुटवडा या संकटाच्या काळात देशासाठी चांगली बातमी आली आहे. रशियन लस स्पुटनिक V लसीची पहिली खेप शनिवारी हैदराबादला पोहोचली आहे. रशियावरुन खास विमानाने स्पुटनिकची ही लस हैदराबादला दाखल झाली आहे.
देशात आजपासून १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहे. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.
काही दिवसापूर्वी ‘स्पुटनिक व्ही’ लसीला भारताच्या DCGI ची मंजुरी मिळाली होती. आणि स्पुतनिक V वापराला मान्यता देणारा भारत हा 62 वा देश ठरला. ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’ या लसीच्या वितरणासाठी असलेल्या कंपनीने भारतात डॉक्टर रेड्डीज लॅब सोबत करार केला आहे. पहिल्या खेपेत दीड ते 2 लाख डोस सध्या भारतात आल्याची माहिती मिळतेय. मात्र मे महिन्याच्या शेवटपर्यंत 30 लाख डोस भारतात येण्याची शक्यता आहे.
स्पुटनिक व्ही लसीची परिणामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. स्पुटनिक व्ही लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या लसीचे दोन डोस वेगवेगळे असल्याने करोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत.
The first lot of Sputnik V vaccines from Russia arrive in Hyderabad#COVID19 pic.twitter.com/uMW0AtM2JD
— ANI (@ANI) May 1, 2021
‘स्पुटनिक व्ही सर्वाधिक प्रभावी लस आहे. दरम्यान, देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 27 लाख 44 हजार 485 जणांना कोरोना लसीच्या मात्रा देण्यात आल्या त्यामुळे आत्तापर्यंतदेण्यात आलेल्या मात्रांची संख्या 15 कोटी 49 लाख 89 हजार 6 शे 35 झाली आहे. देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 12 कोटी 70 लाख 56 हजार 746 जणांना लसीची पहिली मात्रा तर 2 कोटी 79 लाख 32 हजार 889 जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- एका लग्नाची अशीही गोष्ट! विवाहाच्या रात्रीच करवलीसह नवरी फरार
- चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास
- ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपणच जबाबदार’, मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य
- मैत्रीच्या नात्याला काळिमा! फोटो डिलिट करण्याच्या बहाण्याने बोलावून मित्राच्या पत्नीवर अत्याचार
- धक्कादायक! रुग्णालय कर्मचाऱ्यांनी कोरोना बळीच्या खिशातील पैसे काढले, पाच जणांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

