नवी दिल्ली : आज सोमवारी दिनांक २५ ऑक्टोबर रोजी ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कंगना रनौतला तिच्या अभिनयाच्या जोरावर दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
कंगनाला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या गाण्याचे पार्श्वगायक बी प्राक यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर साऊथ सुपर स्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले.
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या निर्णायक मंडळाने 22 मार्च 2021 रोजी विजेत्यांची घोषणा केली होती. आज सकाळी 11 वाजता विज्ञान भवनमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच ‘मरक्कर-अराबिक्कदालिन्ते-सिम्हम’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुस्कार प्रदान करण्यात आला. आनंदी गोपाळ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार. अभिनेता धनुष आणि मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार प्रादन करण्यात आला आला ‘महर्षि’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- ‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप
- “इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

