पुणे : मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस हे आता मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक झालेले आहेत. मनसेने पोलिसांना अल्टीमेटम दिले आहे. त्यामुळे भोंग्यांचा मुद्दा अद्याप संपला नसल्याचे असेच दिसून येत आहे.
हेमंत संभूस यांनी पुणे पोलिसांना एक पत्र दिले आहे. मशिदीवरील भोंगे हे चार दिवसात हटवण्यात यावेत नाहीतर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे शहर मनसेकडून शहरातल्या विविध पोलीस ठाण्यांना पत्र पाठवण्यात आले आहेत. डेक्कन परिसरातील विविध मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी हे पत्र देण्यात आले आहेत.
दरम्यान मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी कालच हनुमान चालिसा लावण्याबद्दल संधिग्दता व्यक्त केली होती, तर आज मनसे सरचिटणीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे पुणे शहर मनसेमध्ये दोन गट पडले आहेत का या प्रश्नाची चर्चा होत आहे.
“एक दिवस रोनाल्डो म्हणून झोपेतून उठलो, तर पहिल्यांदा ‘ही’ गोष्ट करेन”, विराट कोहलीचं वक्तव्य चर्चेत!
भ्रष्ट किरीट सोमय्या उत्तर द्या! राऊतांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांनंतर मनीषा कायंदेंची मागणी
“नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न” – फडणवीसांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर
“चित्रपटात काही धर्मनिरपेक्ष लोक…” द कश्मीर फाइल्सवर नितीन गडकरींचे विधान चर्चेत
IPL 2022 KKR vs MI : कोण जिंकणार? मुंबईकर शास्त्री मास्तरांनी कोलकात्याला दिलं झुकतं माप; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

