Share

पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर देशातील ‘बाबा’ लॉकडाऊन घोषित करतील; पटोलेंचा टोला

Published On: 

मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच संकट वाढत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोनाने थैमान घातला होता. यानंतर मधल्या काळात परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर देशातील टाळेबंदी शिथिल करण्यात आली होती. आता महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक होत असल्याने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीसह कडक निर्बंध जाहीर केले आहेत.

दरम्यान, या कडक निर्बंधांना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. तर महाविकास आघाडीतील नेते त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. एका बाजूला देशातील कोरोना वाढत असताना पश्चिम बंगाल, केरळसह ५ राज्यांची निवडणूक सुरु आहे. तृणमूल नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड काबीज करून पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवलं आहे.

पश्चिम बंगाल मधील विजयासाठी नरेंद्र मोदी तेथील जनतेला विविध आश्वासने देत असून पश्चिम बंगाल मधील निवडणुका पार पडल्यानंतर नरेंद्र मोदी देशात लॉकडाऊन घोषित करतील असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मोदींचा उल्लेख ‘बाबा’ असा करत टोला लगावला आहे. ‘राज्यातील भाजप नेते आता लॉकडाऊनला विरोध करत आहेत. मात्र, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर देशातील “बाबा” लॉकडाऊन घोषित करतील. तेव्हा हे नेते विरोध करणार का ?’ असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!