कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील २०१९ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, ‘ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात मोर्चे काढू नका, मग काय भजन करायचं का? शेतकरी नुकसान भरपाईसाठी तडफडत असताना सरकार मात्र काहीही गरज नाही अशा भूमिकेत आहे.’ राजू शेट्टी यांच्या या टीकेनंतर आता हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
‘माजी खासदार राजू शेट्टी करीत असलेली वक्तव्ये गैरसमजुतीने आहेत. किंबहुना त्यांच्यासारख्या एका जबाबदार नेत्याला ती शोभणारी नाहीत. जबाबदार नेता म्हणून काम करीत असताना दुसऱ्यांना शिव्या-शाप देणे, चिखलफेक करणे व नाहक आरोप करणे बरे नव्हेत,’ असा सल्ला मुश्रीफ यांनी शेट्टींना दिला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी करीत असलेली वक्तव्ये गैरसमजुतीने आहेत. किंबहुना; त्यांच्यासारख्या एका जबाबदार नेत्याला ती शोभणारी नाहीत. जबाबदार नेता म्हणून काम करीत असताना दुसऱ्यांना शिव्या-शाप देणे, चिखलफेक करणे व नाहक आरोप करणे बरे नव्हेत. pic.twitter.com/OG79dyY2mZ
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) August 24, 2021
…तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे; राजू शेट्टींनी दिला इशारा
शेट्टी यांनी २०१९ साली मिळालेल्या मदतीचा देखील यावेळी दाखला दिला. राज्य सरकारने निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संतापाची लाट! रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याला जोड्याने मारून दहन
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा
- राणेंच्या घराबाहेर वरुण सरदेसाईंची पोलिसांना अश्लिल शिवीगाळ, मनसेकडून व्हिडिओ पोस्ट
- राणेंच्या अटकेमुळे आम्ही घाबरणार नाही , दडपणार नाही- केंद्रीय मंत्री भारती पवार
- सरकारच्या जीवावर तुम्ही कोणाकोणाला त्रास देणार?; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

