Share

‘कुणालातरी निवडणुका उरकण्याची…’, संजय राऊतांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

Published On: 

मुंबई : देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी(८ जाने.) केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा(Sushil Chandra) यांनी केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच यावेळी कुणालातरी निवडणुका उरकण्याची घाई असल्याचे म्हणत राऊतांनी भाजपवर अप्रत्यक्ष टोलाही लगावला आहे.

यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’आपण महाराष्ट्रात जे आकडे पाहतोय ते भयानक आहेत. परंतु उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची नोंद होत नाही. त्यामुळे पुढील दोन तीन महिन्यात जे चित्र दिसेल ते भयावह असेल.’ तसेच निवडणूक आयोगाने त्यांचे काम काम केले असून निर्बंध घातले आहेत. परंतु,कुणाला तरी निवडणुका संपवायच्या आहेत,असा अप्रत्यक्ष टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’पंजाब, उत्तर प्रदेश, मनीपूर आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती चांगली नाही. निवडणुक आयोगाने निर्बंध घातले आहेत. हे कागदावरती ठिक आहेत. देशाचे पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना कुठलेही नियम नसतात आणि तेच इतरांसाठी असतात. त्यामुळे निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!