Share

“उत्पल पर्रीकरांनी हिंमत दाखवत शिवसेनेशी संबंध जोडला तर..” संजय राऊतांचे मोठे विधान

Published On: 

पणजी : सध्या गोव्यातील प्रमोद सावंत यांचे सरकार डगमगीत होताना दिसत आहे. आजच भाजप आमदार मायकेल लोबो यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. तर आता मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना आत्तापर्यंत भाजपने तिकीट दिले नाही. त्यामुळे आता यावरच राजकीय चर्चा रंगत असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मोठे विधान केले आहे.

उत्पल पर्रिकर (Utpal parrikar) यांनी हिंमत दाखवायला हवी. जर पर्रिकर यांच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवेसेनेबरोबर संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना नक्कीच त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पणजीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत उत्पल पर्रिकर शिवबंधन बांधणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

उत्पल पर्रिकर यांच्या वडिलांनी भाजपला गोव्यात एक स्थान निर्माण करुन दिले आहे. गोव्यात भाजप रुजवली आहे. त्यांच्याच प्रतिमेवर गोव्यात भाजप टिकला आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांच्यावर अवलंबून आहे. शेवटी राजकारणात धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतात असेही राऊत यांनी म्हटले आहे.

येणाऱ्या काळात गोव्यात भाजप राहते की शिवसेना कळेलच-

तसेच गोव्यात शिवसेनेचं स्थानच नाही, म्हणणाऱ्या प्रमोद सावंत यांना “गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सध्या जमिनीपासून चार हात वर चालत आहेत. भाजपला मुख्य पर्याय म्हणून भविष्यात गोव्याचे लोक शिवसेनेचा विचार करतील त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कधी काळी गोव्यातही भाजपला कोणी विचारत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या काळात गोव्यात भाजप राहते की शिवसेना राहते, हे कळेलच.” असे म्हणत त्यांनी चांगलाच टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!