नवी दिल्ली- सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह टोक्योहून मायदेशी परतलेल्या भारतीय ऑलिम्पिक पथकाचे सोमवारी नवी दिल्लीतील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर नवी दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय राज्य क्रीडामंत्री निश्चित प्रामाणिक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मंचावर लावण्यात आलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अधिक मोठ्या आकाराचा लावल्याबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली.
मेडल मोदी जी जीतकर लाये है? pic.twitter.com/taUykaLCuU
— Srinivas BV (@srinivasiyc) August 9, 2021
काँग्रेसच्या भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनीही ट्विटरवरुन हा फोटो शेअर करत, ‘पदक मोदीजींनी जिंकून आणलंय का?,’ असा खोचक टोला लगावला आहे. बी. व्ही. यांनी अन्य एका ट्विटमध्ये “खुद के चेहरे से ऐसी मोहब्बत.. न पहले कभी देखी है न सुनी है..”, अशा ओळींसहीत या कार्यक्रमामधील मंचाचा फोटो शेअर केलाय ज्यात पंतप्रधान मोदींचा चेहरा फार दुरुनही ओळखू येत असून खेळाडूंचे फोटो तुलनेने लहान आकाराचे आहेत. याशिवाय ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही यासंदर्भात नाराजी व्यक्त केलीय.
महत्त्वाच्या बातम्या
- उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा वाद : नाशिकमध्ये सेनेसह आघाडीत सर्वच पदाधिकारी नाराज
- कंगनाच्या ‘त्या’ याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध
- ९ ऑगस्ट ठरला ऑस्ट्रेलिया क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट दिवस
- नीरज चोप्राने बायोपिकसाठी दिली ‘या’ दोन अभिनेत्यांना पसंती
- दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव शिवाय टीम इंडिया लॉर्ड्सवर रवाना


