🕒 1 min read
बारामती : ऊसाच्या बिलातून वीज बिलाची वसुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाचाच आता माजीमंत्री हर्षवर्धन पाटील (Former Minister Harshvardhan Patil) यांनी कडाडून विरोध केला आहे. ऊसाच्या बिलातून वीज बिलाची वसुली करणे बेकायदेशीर असून आम्ही शेतकऱ्यांची थकित विज बील वसुली होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून केलेली थकीत वीज बिलाची वसुली चुकीची असून वास्तविक पाहता शेतकऱ्यांना विजेची बिले अव्वाच्या सव्वा आली आहेत. सदरची चुकीची आलेली कित्येक पट जास्तीची वीज बिले दुरुस्त करून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी नेहमीच वापरलेल्या विजेची बिले भरलेली आहेत.
त्यामुळे राज्यसरकरने हा निर्णय मागे घ्यावा. जर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थकीत वीज बिल वसुलीचा तगादा लावला, तर राज्यामध्ये भाजपतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘ठाकरे’ सरकारमुळेच औरंगाबाद एलईडीच्या झगमगाटात उजळले-अंबादास दानवे
- “२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल”, भाजप नेते कपिल पाटील यांचे मोठे वक्तव्य
- ‘मन की बात’ एकत्र ऐकता यावी यासाठी सर्व शक्ती केंद्रावर व्यवस्था करणार-चंद्रकांत पाटील
- “…तर तुम्हाला आमचे पाहुणे बनावे लागेल”, ट्रोलर्सच्या प्रश्नांना मुंबई पोलिसांचे उत्तर
- “नाव सार्थकी लागले… मविआ-मद्य विक्री आघाडी”, सदाभाऊंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
