नवी दिल्ली: कीव्ह शहरातून मायदेशात निघालेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग यांनी सकाळी दिली होती. दरम्यान तो विद्यार्थी कोण आहे आणि त्याच्यासोबत नेमके काय घडले हे त्यानेच सांगितले आहे.
किव्हमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव हरजोत सिंग (Harjot Singh) आहे. तो मूळचा छत्तरपूरचा आहे. त्याच्या पायाला खूप वेळ मार लागल्यानं त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. “गोळी माझ्या खांद्यावरून घुसली. डॉक्टरांनी माझ्या छातीतून एक गोळी काढली आहे.” असे हरजोत सिंग याने किव्ह सिटी हॉस्पिटलमधून बोलताना म्हटले आहे.
तसेच यावेळी हरजोत सिंगने ‘मी दूतावासातील लोकांशी संपर्क साधला आणि विचारले की ते मला ल्विव्हला नेण्यासाठी सुविधा देऊ शकतात का. मला चालता येत नव्हतं. पण मला फक्त खोटी आश्वासनं मिळाली. मी अधिकार्यांना फोन करत राहिलो. पण कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही.”, असा आरोपही त्याने केला आहे. दरम्यान या अगोदर कर्नाटक विद्यार्थी नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता ही नवीन माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत दोन भारतीय विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- १०० सामन्यांचा तर केलाच, परंतु अजूनही एक विक्रम ‘किंग कोहलीने’ आपल्या नावावर केला आहे
- IND vs SL : दुर्दैव..! ऐतिहासिक कसोटीत विराट अपयशी; शतक तर हुकलच सोबतच…
- एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नाही; अनिल परबांनी विधानसभेत मांडला अहवाल
- ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल म्हणाला, “माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा…”
- ओबीसी आरक्षणाला राज्य सरकारकडून ‘धक्का नाही धोका’; पंकजा मुंडे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

