कुशल बद्रिके : चला हवा येऊद्या या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो.कुशल प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवतो. त्याच्या पोस्ट देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतीच कुशलनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर करून त्याच्या आयुष्यात प्रेयसी जागा घेणाऱ्या व्यक्तीबद्दल चाहत्यांना माहिती दिली.
चला हवा येऊ द्या शोमधील सर्वच कलाकारांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. या शोमधील विनोदवीर भाऊ कदमचा काल वाढदिवस झाला . सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान या शोमधील त्याचा सहकलाकार आणि मित्र कुशल बद्रिके ने भाऊ कदमला हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कुशलची खास पोस्ट
कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो बेडवर झोपलेला दिसत असून त्याच्या शेजारी भाऊ कदम झोपेत घोरताना दिसतो आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, माझ्या आयुष्यातली प्रेयसीची जागा घेणारा एकमेव माणुस म्हणजे “भाऊ कदम”, प्रेयसी कशी आपली झोप उडवते, तशीच माझी झोप उडवणार्या माझ्या मित्रा, तुला वाढदिवसाच्या घन”घोर” शुभेच्छा. असा भाऊ कदम यांच्या नकळत त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे. भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्याने ही व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

