Share

“हार्दिक पंड्या हा सर्वोत्तम कॅप्टन आहे”, वाचा कोणी दिलीय ही प्रतिक्रिया!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये गुजरात टायटन्सचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने त्याचा कर्णधार हार्दिक पंड्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हार्दिकचे खूप कौतुक केले आहे. हार्दिक सर्वोत्तम कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली मी खेळलो आहे, असे यश म्हणाला.

हार्दिकची आयपीएलमधील कामगिरी चांगलीच होती. त्याने यंदा जबरदस्त नेतृत्व केले आणि पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले. त्याने १५ सामन्यात आपल्या संघासाठी ४८७ धावा केल्या. या मोसमात त्याने चार अर्धशतकेही झळकावली. गोलंदाजीतही पंड्याने आठ विकेट घेतल्या. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी हार्दिक पंड्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आयर्लंड दौऱ्यावर वरिष्ठ खेळाडू उपलब्ध नसतील आणि त्यामुळेच हार्दिकला या युवा संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

यश म्हणाला, ”हार्दिक पंड्या खूप शांत आणि आत्मविश्वासू आहे आणि त्याला काय करायचं हे माहीत आहे. तो गोलंदाजांचा कर्णधार आहे. तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर ते तुम्हाला तुमचे निर्णय स्वतः घेऊ देतात. यामुळे कोणत्याही गोलंदाजाचा आत्मविश्वास खूप वाढतो. मी म्हणेन की मी खेळलेल्या कर्णधारांपैकी हार्दिक हा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार आहे.”

यश दयालने आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्ससाठी ९ सामने खेळले आणि ९.२५च्या इकॉनॉमी रेटने ११ बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!