🕒 1 min read
मुंबई : काल रविवारी रात्री झालेल्या आशिया चषकाच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. या विजयाचा हिरो हार्दिक पांड्या होता. हार्दिकने आधी गोलंदाजीत धडाका लावला आणि नंतर फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. यामुळे त्यांच संपूर्ण देशभर कौतुक केलं जात आहे. अशातच त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक ने त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
हार्दिक पांड्या च्या पत्नीने केल्या या पोस्ट-
हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने इन्स्टाग्रामवर हार्दिक पांड्याचा विजक साजरा केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर खूप स्टोरीज टाकलेल्या पाहायला मिळतं आहे. पहिल्या स्टोरीमध्ये नताशाने हार्दिकच्या स्कोरचा फोटो टाकला असून, ‘यू आर माय स्टार’ असं त्यामध्ये लिहिलं आहे. दुसऱ्या स्टोरीमध्ये तिने हार्दिक आपली बॅट वरती केरत असल्याचा फोटो शेअऱ केला आहे आणि त्या फोटोला तिने ‘प्राऊड’ असं कॅप्शन दिलं आहे.
तसेच, तिसऱ्या स्टोरीमध्ये नताशाने हार्दिकचा ‘मॅन ऑफ द मॅच’ ग्राफिक आणि सामन्यातील त्याचा आणखी एक फोटो शेअर केला. यासोबतच तिने एक व्हिडीओही आपल्या स्टोरीमध्ये टाकला आहे. त्या व्हिडीओमध्ये हार्दिकने षटकार मारला असल्यामुळे कमेंटेटर त्याचे हार्दिकचे कौतुक करत होते. ‘ऑलराउंडर पंड्या आणि सर्वात मौल्यवान खेळाडू पांड्या’, असं ते म्हणत आहेत. नताशाच्या सगळ्या स्टोरीजवरून असे वाटते की, तिला खूप आनंद झाला आहे.
गोष्टी साध्या ठेवण्याचा प्रयत्न केला-
दरम्यान, भारताला शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती, जी हार्दिकने सहज पूर्ण केली. सामन्यानंतर त्याने सांगितले की, 20व्या षटकात माझ्यापेक्षा गोलंदाज जास्त दडपणाखाली असेल हेही मला माहीत होतं. मी येथे गोष्टी साध्या ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला शेवटच्या षटकात फक्त 7 धावा हव्या होत्या पण आम्हाला 15 धावा लागल्या असत्या तरी मी ते केले असते.
महत्वाच्या बातम्या :
- Momin Saqib | “भाई तेरा छक्का नही भूलूंगा…” ; पाकिस्तानी चाहता मोमीन साकिब याचं हार्दिक पांड्या साठी ट्विट
- Jayant Patil | मागील पिढीचा आदर केला पाहिजे – जयंत पाटील
- Girish Mahajan | जिंकणं हे आता शिवसेनेचं स्वप्नच बनून राहणार- गिरीष महाजन
- Amol Mitkari | मोहित कंबोज यांच्यावर अमोल मिटकरींचा हल्लाबोल! म्हणाले, “महाराष्ट्रमध्ये दूरवर …”
- Chandrakant Khaire | शिंदे गटातील आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, ते आमदार परत येणार- चंद्रकांत खैरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
