मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना पक्षातील आमदार गेल्यापासून शिंदे गट आणि शिवेसना असे दोन गट पडले आहेत. या गटांमधील नेते एकमेकांवर आरोप करत असतात. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसापांसून 50 खोकेंची घोषणाही प्रसिद्ध झाली आहे. अशातच रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्या टीकेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत-
संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत चंद्रकांत खैर यांनी संदीपान भुमरे यांच्यावर हल्ला केला आहे. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं शिंदे गटातील आमदार शिवसेनेत येणार-
“उद्धव ठाकरे यांचे समर्थक 2 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील”, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला होता. त्यावर खैरेंनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही. पण उलट यांचे 40 आमदार आम्हाला फोन करत आहेत.
तसेच, पुढे खैरेंनी सांगितलं की, शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन आमचं चुकलं!, असं म्हणतात. मी त्यांना म्हटलं की या मग परत उद्धव साहेबांकडं. त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | “रोहित पवार यांना नोटीस आल्या ही एक अफवा, आम्हाला…”, सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं
- IND vs PAK | “मला माहित माझ्यापेक्षा…” ; रोमांचक सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याची ‘त्या’ षटकारावर प्रतिक्रिया
- Gulabrao Patil | “आमच्याकडे बायको नांदत नाहीत तो पण…” ; गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त विधान
- Mohit Kamboj | मोहित कंबोज यांच्या ट्विटवर रोहित पवार यांची प्रतिक्रीया, ईडीची देखील चौकशी नसल्याचं स्पष्ट
- GulabRao Patil | “…तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ”; गुलाबराव पाटील यांचं चॅलेंज

