Share

Momin Saqib | “भाई तेरा छक्का नही भूलूंगा…” ; पाकिस्तानी चाहता मोमिन साकिब याचं हार्दिक पांड्या साठी ट्विट

Published On: 

दुबई : रविवारी रात्री झालेल्या आशिया चषकाच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. या विजयाचा हिरो होता हार्दिक पांड्या. हार्दिकने आधी गोलंदाजीत धडाका लावला आणि नंतर फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. भारताला शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती, जी हार्दिकने सहज पूर्ण केली. दरम्यान पाकिस्तानी चाहता मोमिन साकिब याने केले ट्विट केलं आहे. सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेल्या दोन व्हिडिओंमध्ये, मोमिन साकिब भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याला भेटताना दिसत आहे.

मोमिन साकिब यांचं हार्दिक पांड्या साठी ट्विटः

‘मारो मुझे मारो’ फेम पाकिस्तानी फॅन मोमिन साकिबने काही व्हिडिओ सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत ज्यात तो दुबईत सुरू असलेल्या आशिया कपमधील सामन्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याला भेटताना दिसत आहे.

2019 च्या विश्वचषकात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघावर साकिब त्याच्या ‘मारो मुझे मारो’  या विडियो मुळे प्रसिद्ध झाला. साकिबने विजयाबद्दल हार्दिक पांड्याचे अभिनंदन केले आणि सांगितले की तो 11 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान फायनलसाठी उत्सुक आहे.

साकिबने ट्विटरवर लिहिले, “चांगला नेक-टू-नेक गेम झाला. तरुण असूनही आणि कच्ची प्रतिभा असूनही, आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. पण तुम्ही चांगली फलंदाजी करून सामना आमच्यापासून दूर नेला. हार्दिक पांड्या भाई तेरा छक्का नही भूलूंगा!”

व्हिडिओमध्ये साकिब म्हणाला, “आयपीएल विजेतेपदानंतर पुनरागमन केल्याबद्दल अभिनंदन आणि ‘आज भी बडा अच्छे आप खेले’ तुम्हाला पाहून आनंद झाला, इंशाअल्लाह, फिर फायनल में मिलेंगे.”

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!