Share

Jayant Patil | मागील पिढीचा आदर केला पाहिजे – जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

अकोला : मागच्या पिढीचा आपण नेहमी आदर ठेवला पाहिजे, परंतू आता मागच्या पिढीचा अनादर करण्याची प्रथा प्रवृत्ती वाढलीय, मागील पिढीने काहीच केलं नाही, असं सांगन्याची प्रथा आता अलिकडच्या काळात सुरु झालीय, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. ते अकोल्यातील मूर्तिजापूर मध्ये आयोजित सहकार नेते तथा माजी आमदार भैय्यासाहेब तिडके यांच्या 75 व्या अमृत महोत्सव सोहळ्यात बोलत होते. पुढे म्हणालेत बोलतांना म्हणाले की जगाच्या कोणत्याही देशाचा ऱ्हास कधी सुरु होता. जेव्हा आपण मागच्या पिढीने केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्याला सुरुवात करतोय. तेव्हा त्या पिढीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. असेही ते म्हणाले.

अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या देशात टाचणी तयार होत नव्हती. आता आयआयटी, आयआयएमसारख्या संस्था उभ्या आहेत. या संस्था या जुन्या नेत्यांनी तयार केल्या. गुगल, ॲपल याठिकाणी प्रमुख म्हणून भारतीय व्यक्ती आहेत. जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये भारतीय तरुण प्रमुख स्थानी आहेत. कारण पंडित जवाहरलाल नेहरुंनी त्याकाळात आयआयएम तयार केल्या होत्या. हा तुमच्या माझ्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. तेव्हा केलेल्या कष्टाचे फळ आता मिळते आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!