मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मोहित कंबोज यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यादरम्यान राष्ट्रवादीच्या संवाद दौऱ्या वेळी जळगावत असताना एकनाथ शिंदे यांनी मला बोलावलं होतं. त्यामुळे मी जळगावला गेलो असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं. यावेळी मिटकरी यांनी मोहित कंबोज यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
मोहित कंबोज हे कुणाच्या इशाऱ्यांवर काम करतात हे सर्वांनाच माहित आहेः
मोहित कंबोज हे कुणाच्या इशाऱ्यांवर काम करतात हे सर्वांनाच माहित आहे. त्यांना भाजपमध्ये आरोप करण्यासाठीच ठेवलं असून महाराष्ट्रमध्ये दूरवर त्यांचा संबंध नाही आणि ते ज्यांच्यावर आरोप करतात ते त्यांना उत्तर देण्यास देखील समर्थ आहेत. त्यामुळे मनोज कंबोज यांना फारसं महत्त्व द्यावं, असं मला वाटत नसल्याची जोरदार टीका मिटकरी यांनी केली आहे.
अमोल मिटकरी यांची टीकाः
काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. यावेळी विनाशकाली विपरीत बुद्धी, असा टोला शिवसेनेवर देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. यावर उत्तर देत संभाजी महाराजांचा इतिहास देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. त्यामुळे विनाश कोणाचा होईल आणि विपरीत बुद्धी कोणाची आहे हे फडणवीसांना चांगलंच माहिती आहे अशी बोचरी टीका अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर केली आहे.
दरम्यान, प्रादेशिक पक्ष वाचवायला पुरोगामी संघटनेने काही पावलं उचलली आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा या देशाची विचारधारा असू शकत नाही, त्यामुळे भाजपच्या गटात अस्वस्थता वाढली आहे, अशी खोचक टीका मिटकरींनी केली आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Chandrakant Khaire | शिंदे गटातील आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, ते आमदार परत येणार- चंद्रकांत खैरे
- IND vs PAK | पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचा खरा हिरो कोण? ; सचिन तेंडुलकरची मोठी प्रतिक्रिया!
- Amol Mitkari | अमोल मिटकरींनी किरीट सोमय्यांची नक्कल करत लगावला खोचक टोला
- Supriya Sule | “रोहित पवार यांना नोटीस आल्या ही एक अफवा, आम्हाला…”, सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं
- IND vs PAK | “मला माहित माझ्यापेक्षा…” ; रोमांचक सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याची ‘त्या’ षटकारावर प्रतिक्रिया


