Share

हरभजनच्या बाळाचे घरी पदार्पण, व्हिडीओ शेअर करत आई गीताने व्यक्त केला आनंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटु हरभजन सिंग दुसऱ्यांदा बाबा झाला. त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसराने मुलाला जन्म दिला आहे. या दांपत्यांना यापुर्वी हिनाया नावाची एक मुलगी आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटु हरभजन सिंगच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. हरभजनची पत्नी गीता बसराने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. हरभजन सिंगने ट्विट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. आयपीएल दरम्यान हरभजन आणि गीता बसरा हे दोघे एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्षे डेट केल्यानंतर २०१५ मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नानंतर एका वर्षातच त्यांना हिनाया नावाची मुलगी झाली होती.

https://www.instagram.com/p/CRTeTmWj_59/?utm_source=ig_web_copy_link

आता पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हरभजनचं नवजात बाळ आणि पत्नी गीता घरी परतल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातून डिस्जार्ज मिळाल्यानंतर हरभजनची पत्नी गीताने बाळ घरी आल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी गीताने बाळाच्या स्वागतासाठी बरीच तयारी केलेली दिसली. इंस्टग्रामवर व्हिडीओ शेअर करत गीताने लिहिले की, ‘Born in 2021’. बाळाच्या घरी येण्याने गीताची पहिली मुलगी फार आनंदित देखील दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CRI9ExwnR4H/?utm_source=ig_web_copy_link

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!