Share

विराटचे यश कोणाला पचले नाही? हरभजनचा रवी शास्त्रींना सवाल

Published On: 

नवी दिल्ली : विराट कोहलीने टेस्टच्या कर्णधारपद सोडल्यापासून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. नुकत्याच भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ” विराटचे यश काही लोकांना पचले नाही” असे मोठे वक्तव्य केले होते. आता शास्त्रीच्या या वक्तव्यावर हरभजन सिंगने प्रतिक्रिया दिली आहे.

विराट अजून काही काळ नेतृत्व करू शकला असता , मात्र काही लोकांना त्याचे यश पचणी पडले नाही असे रवी शास्त्री यांनी सांगितले होते. यावर हरभजन म्हणाला ” शास्त्री म्हणाले की विराटने अजून १५ सामने कर्णधारपद निभावले असते तर लोकांना ते पचले नसते. त्यांनी केलेले हे वक्तव्य खूप मोठे आणि गंभीर आहे. कसोटीमध्ये भारताच्या सर्वात सफल कर्णधार म्हणून विराटची जागा अबाधित राहणार आहे. ” सोबतच हरभजनने शास्त्रींना सवालही केला आहे . ” मला समजलेच नाही की शास्त्री यांच्या म्हणयानुसार कोणाला विराटचे यश पचले नसते. आम्हा भारतीयांना तर त्याच्यावर गर्व आहे.”

रवी शास्त्री यांचे असे म्हणणे होते की भारतीय संघ पुढचे काही वर्ष जास्तीत जास्त सामने घरच्या मैदानावर खेळणार आहे, त्यामुळे विराट कोहली जर कर्णधार असता तर त्याने संघाला अजून काही सामने जिंकून दिले असते. भारतीय संघाचा घरच्या मैदानावर खेळतानाचा रेकॉर्ड चांगला आहे. खेळल्या गेलेल्या ३१ कसोटी सामन्यात भारताला केवळ दोनदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!