Share

‘या’ बडया सेलिब्रिटींनी रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या ‘पुष्पा’ला नाकारले

Published On: 

मुंबई : सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट पुष्पाची (film Pushpa) जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची लोकप्रियता सर्वत्र दिसून येत आहे. मात्र अल्लू अर्जूनला चित्रपटातील भूमिकेबद्दलची ऑफर यापूर्वी इतर स्टार्सला देण्यात आली होती. जाणून घेऊ या.

दरम्यान पुष्पा चित्रपटाचा फिव्हर जगभरातील लोकांपर्यंत पोहोचला आहे. या चित्रपटात इतर कलाकारांना ऑफर होती, मात्र ‘पुष्पा’ चित्रपटात त्यांनी काम करण्यास नकार दिला होता. त्यापैकी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ‘पुष्पा’ चित्रपटात महेश बाबूला मुख्य भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्यात काम करण्यास नकार दिला. जेव्हा महेश बाबूला समजले की या चित्रपटातील व्यक्तिरेखा ग्रे शेड आहे आणि त्याला ही भूमिका वठविण्यासाठी मेकओव्हर करावा लागेल, तेव्हा त्याने त्यात काम करण्यास नकार दिला.

तसेच फहद फासिल याने चित्रपटात ‘एसपी भंवर सिंग’ ची भूमिका साकारली आणि सर्वांना प्रभावित केले. मात्र त्यापूर्वी ही भूमिका साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीला (Vijay Sethupathi) देण्यात आली होती. मात्र तारखा अभावी त्यांनी चित्रपटात काम करण्यास  नकार होता. तसेच बंगाली चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार जिशू सेनगुप्ता आणि जिशूची पहिली पसंती होती. मात्र तारखेच्या वादामुळे त्याने चित्रपटात काम केले नाही. आणखी एक नाव भंवर सिंगच्या भूमिकेसाठी होते, ते अभिनेता नारा रोहितच्या नावाची.

चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘यू अंतवा’साठीही नोरा फतेहीच्या नावाची चर्चा होती. मिळालेल्या वृत्तानुसार नोराने (Nora Fatehi) या गाण्यावर परफॉर्म करण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी केली होती, जी चित्रपट निर्मात्यांना पचनी पडली नाही आणि त्यांनी त्यांचा विचार बदलला. आणखी एका विशेष पात्र श्रीवल्लीची भूमिका समंथाला (Samantha Prabhu) प्रथम मिळाली होती. मात्र तिने ही भूमिका नाकारल्यानंतर रश्मिका मंदानाने ती भूमिका साकारली. त्याचवेळी दिशा पटानीला पहिल्या आयटम नंबर ‘यू अंटावा’वर परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र दिशाने नकार दिल्यानंतर त्यात सामंथाने परफॉर्म केले.

 

द फॅमिली मॅनच्या यशानंतर समंथा प्रभूचे तारे उंचावत आहेत. समंथालाही पुष्पा चित्रपटाची ऑफर मिळाली. रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्नाने साकारलेल्या श्रीवल्लीच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. काही कारणास्तव हा चित्रपट करण्यास नकार दिला. ती आयटम नंबर ‘यू अंतवा’ गाण्यात परफॉर्म करताना दिसली असून प्रचंड लोकप्रियता मिळविले आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!