मुंबई: जानवर, एक रिश्ता, अंदाज, बरसात, हां मैंने भी प्यार किया है, शकालाका बूम बूम यासारख्या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता मुंबई पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.
दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सांगितले की, २०१७ मधील एक हसीना थी, एक दिवाना था हा चित्रपट मला न विचारता यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. कॉपीराईट पूर्णपणे माझ्याकडे आहे आणि मी या चित्रपटाचे हक्क विकलेले नाहीत, असे असतानाही हा चित्रपट अपलोड करण्यात आला असल्याचे सुनील दर्शन यांनी सांगितले. या चित्रपटाला मिळणाऱ्या हिट्सचा फायदा काही दुसऱ्याच व्यक्ती आणि यूट्यूबला होत आहे. एक निर्माता म्हणून मला त्यातून एक पैसाही मिळत नाही, अशी खंत सुनील दर्शन यांनी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना दर्शन म्हणाले, माझ्या श्री कृष्णा इंटरनॅशनल या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत जवळपास २० चित्रपटांचे कॉपीराईट माझ्याकडे आहेत. पण त्याआधी, एक हसीना थी, एक दिवाना वगळता, माझ्या जवळपास प्रत्येक चित्रपट आणि त्यांची गाणी YouTube वर अपलोड करण्यात आली होती. याप्रकरणी २०११ मध्ये गुगल आणि यूट्यूबविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण २०१९ पर्यंत चालले आणि न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिला.
सुनील दर्शन यांनी सुंदर पिचाई यांच्यासह गुगल आणि यूट्यूबशी संबंधित आणखी पाच अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. यामध्ये गौतम आनंद, जो गियर, नम्रता राजकुमार, पवन अग्रवाल आणि चैतन्य प्रभू यांचा समावेश आहे. या सर्वांवर कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्याची माहिती सुनील दर्शन यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
टिपूच्या बगलबच्चाना जनता योग्य धडा शिकवेल… हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळू देणार नाही- आ.अतुल भातखळकर
रेल्वेच्या परीक्षेत हेराफेरी झाल्याचा आरोप; संतप्त विद्यार्थ्यांनी पेटवली ट्रेन
“काँग्रेस-राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपचा…”, जयंत पाटलांचे वक्तव्य
Republic Day: औरंगाबाद लवकरच १००% लसीकरणयुक्त होईल; पालकमंत्र्यांचे सुतोवाच..!


