Share

आता मिशन वर्ल्डकप..! क्रिकेटर स्मृती मंधानानं डोळ्यासमोर ठेवलं एकच लक्ष्य; वाचा सविस्तर

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाला दुसऱ्यादा आयसीसी वूमन क्रिकेटर या पुरस्काराने सन्मानित केले आहे. तिने २०२१ मध्ये धमकेदार कामगिरी केली होती. तिने २२ आंतरराष्ट्रीय सामन्यात ८५५ धावा केल्या होत्या.

पुरस्कार भेटल्यानंतर स्मृतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ” आता माझे सगळे लक्ष २०२२ चे विश्वकप जिंकण्याकडे लागले आहे. ” भारतीय महिला संघाचा आगामी दौरा न्यूझीलँडमध्ये आहे. जिथे संघ एक टी ट्वेन्टी आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

स्मृतीने २०२१ मध्ये ३८.८६ च्या सरासरीने केलेल्या ८५५ धावांमध्ये पाच अर्धशतक आणि १ शतक आहे , जो ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्याच पिंक बॉल टेस्टमध्ये तिने केला होता. भारतीय महिला क्रिकेट संघासाठी २०२१ हे फारसे चांगले ठरले नव्हते. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत भारताला आठ पैकी फक्त दोन सामने जिंकता आले होते. त्या दोन्ही सामन्यात विजयाची शिलेदार स्मृतीच ठरली होती. त्यामुळे स्मृती भारताला महिला क्रिकेटचा पहिला विश्वचषकही जिंकून देईल अशी अशा चाहत्यांना आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!