Share

आदित्य ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना दुरूनच जोडले हात; ताफ्यातही मिळाली नाही एंट्री…!

Published On: 

औरंगाबाद: पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. मात्र आदित्य ठाकरेंच्या ताफ्यात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला घुसता आले नाही. ४ वाजता आदित्य ठाकरे चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले होते. त्यांच्या गाडीत जाण्याची परवानगी कोणालाही मिळाली नाही. कुठलाही नेता शहरात दाखल झाल्यावर त्यांच्यात ताफ्यात घुसण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांची चढाओढ लागते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे(Aaditya Thackrey) यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना चार हात लांबच ठेवणे पसंत केले.

चिकलठाणा विमानतळ ते जिजामाता चौक एलईडी स्ट्रीट लोकार्पण, खाम इको पार्कचा लोकार्पण सोहळा, खाम नदी, लोखंडी पूल, ई- गव्हर्नन्स प्रकल्प, नागरी सुविधा केंद्रे, जी.आय. एस.मॅपिंग प्रकल्प, ७५ स्मार्ट किऑस्क, इलेक्ट्रीकल व्हेईकल, इत्यादी विकास कामांचा शुभारंभ आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर आदित्य ठाकरे यानिमित्ताने शहरात आलेले आहेत. त्यामुळे विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.

यातील अनेकांनी त्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. अनेक मोठ्या नेत्यांना तर ठाकरे यांच्या गाडीत बसण्याची इच्छा होती. मात्र ती इच्छा इच्छाच राहिली कारण ठाकरे यांच्या गाडीत कोणालाही एंट्री मिळाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे पुरेपूर काळजी घेतांना दिसत आहेत. ठाकरे यांच्यासाठी असलेली गाडी थेट मुंबईतून आली होती. आणि या गाडीचा ड्रायव्हरही मुंबईतून आलेला होता. त्यामुळे औरंगाबाद ची गाडी नको आणि इतर पदाधिकारी नको असेच एकंदरीत आदित्य ठाकरे यांचा मुड पाहायला मिळाला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!