नवी दिल्ली: सध्या देशभरात पद्मश्री पुरस्कारासाठी (Padmashri Award) नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र अनेकांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला असल्याचे देखील समोर येत आहे. एकीकडे पद्मश्री पुरस्कार हा देशातील प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये मोडला जातो, तरीही त्याचे फारसे महत्व राहिले नसल्याचे सध्या दिसत आहे. त्यात प्रसिद्ध तबलावादक अनिंदो चटर्जी (Pt. Anindo Chatterjee) यांनी देखील हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
जाहीर झालेल्या पद्मश्रीची माहिती देताना पंडित अनिंदो चटर्जी म्हणाले, मला मंगळवारी दिल्लीतून पुरस्कार स्विकारण्याबाबत संमतीसाठी फोन आला. मात्र, मी विनम्रपणे हा पुरस्कार नाकारला आहे. मी या पुरस्कारासाठी धन्यवाद म्हटलं, मात्र करियरच्या या टप्प्यावर मी हा पुरस्कार स्विकारण्यास तयार नसल्याचं कळवलं. मला १० वर्षांपूर्वी हा पुरस्कार मिळाला असता तर मी आनंदाने स्विकारला असता. माझ्यासोबतचे आणि अगदी माझ्या कनिष्ठांना देखील हा पुरस्कार आधीच मिळाला आहे. त्यामुळेच मी माफी मागत खूप नम्रपणे हा पुरस्कार स्विकारू शकत नाही असं कळवलं, अशी माहिती पंडित अनिंदो चटर्जी यांनी दिली.
बंगालच्या संगीत विश्वातून पुरस्कार मिळूनही तो नाकारणारे चॅटर्जी दुसरे व्यक्ती ठरले आहेत. पंडित अनिंदो चटर्जी यांनी २००२ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी याआधीच राष्ट्रपती भवनमध्ये देखील तबलावादन केलंय. १९८९ मध्ये ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये सादरीकरण करण्याचा मान मिळालेले ते सर्वात तरूण तबलावादक होते. पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी या आधी पंडीत रवीशंकर, उस्ताद अमजद अली खान आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबत संगीत मैफील गाजवली आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘या’ बडया सेलिब्रिटींनी रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या ‘पुष्पा’ला नाकारले
आदित्य ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना दुरूनच जोडले हात; ताफ्यातही मिळाली नाही एंट्री…!
आता मिशन वर्ल्डकप..! क्रिकेटर स्मृती मंधानानं डोळ्यासमोर ठेवलं एकच लक्ष्य; वाचा सविस्तर
Google CEO सुंदर पिचाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल; वाचा नेमकं काय आहे प्रकरण
टिपूच्या बगलबच्चाना जनता योग्य धडा शिकवेल… हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळू देणार नाही- आ.अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

