Share

कोरोना टेस्टच्या कारणावरुन मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओवर हरभजनने व्यक्त केला संताप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक मान्यवरांनाही या संसर्गाची लागण झाली आहे. तसेच या काळात देशभरात अनेक ठिकाणी अपुऱ्या औषधामुळे आणि अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्णांना जिव गमवावा लागत आहे. यादरम्यान कोरोना संदर्भात सोशल मीडीयावर अनेक माहिती शेअर केली जात आहे.

या दरम्यान सोशल मीडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन व्यक्ती एका मुलाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. ते दोघे त्या मुलाला कोरोना चाचणी करण्यास सांगत होते मात्र त्या मुलाने नकार दिल्यानंतर त्या दोन्ही व्यक्तिनी त्या मुलाला मारहाण केली. हा व्हिडीओ बंगळुरु मधील आहे अशी माहिती समोर आली आहे. शिल्पा नावाच्या ट्विटर युझरने हा व्हिडीओ शेअर करत ‘कोरोना चाचणी करण्याची बंगळुरुमधील पद्धत’ असे कॅप्शन देत हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटला रिट्विट करत भारताचा माजी क्रिकेटपटु हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे.

रिट्विट करताना हरभजन म्हणतो की, ‘हे किती लज्जास्पद आहे, कोरोना चाचणी करण्यासाठी या मुलाला का मारहाण करत आहे. अशाच प्रकारे आपण कोरोनाविरुद्ध जिंकणार आहोत का? हे खुप वाईट आहे.’ असे लिहत संताप व्यक्त केला आहे. मात्र अद्यापही या व्हिडीओ मागील खरे सत्य समोर आलेले नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!