Share

सुष्मिता सेन ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या होती प्रेमात; परंतु शेवटपर्यंत नाही निभावू शकले नातं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही चित्रपटांसोबतच ती आपल्या खासगी आयुष्यामुळं कायम चर्चेत असायची. सुष्मिता लोकप्रिय अभिनेत्री असताना पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वासिम अकरम यांच्या प्रेमात पडली होती आणि ते देखील तिच्या प्रेमात होते. मात्र तरी देखील त्याचं लग्न काही होऊ शकलं नाही. वासिम यांचे पहिले लग्न झाले होते. २००९ साली वासीम यांनी पत्नी हुमा हिच्यासोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ते दोघं लग्न देखील करणार होते.

वासीम आणि सुष्मिताची पहिली भेट एका डान्स शोच्या सेटवर झाली होती. कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे भेटले आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनाही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं जाऊ लागलं. मात्र वासीम सुष्मिताच्या जगण्याच्या पद्धतीवर नाराज होते.

https://www.instagram.com/p/B9RgSReh68J/?utm_source=ig_embed&ig_rid=412a6dfe-147e-4b7b-840f-1ad386f74c4d

सुष्मिता एक अभिनेत्री असल्याने तिची लाइफस्टाइल आणि व्यस्त शेड्युलमुळे वासीम स्वतःला कमी लेखू लागले होते. सुष्मिताच्या कामामुळे तिला त्यांच्या नात्याला वेळ देता येत नव्हता. त्यामुळे वासीम चिडचिड करू लागले होते. अखेर त्या दोघांनीही आपल्या नात्यावर पुन्हा विचार करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर दोघांनी कधीही त्यांच्या नात्यावर भाष्य केलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!