Share

‘ये दोस्ती… हम नही तोडेंगे…’, संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Published On: 

मुंबई : आज मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हीरकमहोत्सवी म्हणजेच ६० वा वाढदिवस आहे. ठाकरेंवर अनेकांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीहि ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

‘ये दोस्ती….हम नही तोडेंगे…’आपण आमच्या आयुष्यात खास आहात…आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे.. असे ट्विट करत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री १२ वाजताच दिलेल्या शुभेच्छा व त्यासोबत शेअर केलेला फोटोची जास्त चर्चा होत आहे. तर वाढदिवसाच्या निमित्ताने ‘सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा,’ अशा मथळ्यासह आज सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

दरम्यान, यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी आवाहन केले आहे कि, कार्यालय किंवा मातोश्री या निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करु नका. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करु नका आणि फलक लावू नका’.

मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत, हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन

#व्यक्तीविशेष : उद्धव ठाकरे – एक छायाचित्रकार मुख्यमंत्री कसा बनला ?

संजय राऊतांनी दिल्या वेगळया पद्धतीने नागपंचमीच्या शुभेच्छा, म्हणाले…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!