परभणी : दिल्ली येथील बजरंग दलाचा कार्यकर्ता रिंकू शर्मा याच्या निघृर्ण हत्येप्रकरणातील आरोपिंविरूध्द फास्टट्रॅक कोर्टात खटला उभारून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनातून केली.
विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री अनंत पांडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हादराव कानडे पाटील, महानगराध्यक्ष राजकुमार भांबरे, जिल्हामंत्री सुनिल रामपूरकर, धर्मप्रसारक प्रमुख गणेश, काळबांडे, प्रखंड पालक विश्वास दिवाळकर, महानगरमंत्री अभिजीत कुलकर्णी, शहरसहमंत्री विनोद लोलगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयास एक निवेदन दिले.
त्याद्वारे दिल्लीतील मंगोलपुरी भागातील कार्यकर्ता रिंकू शर्मा याच्या हत्येचा तीव्र निषेध केला. श्रीराम जन्मभूमी निर्माण अभियानात निधी संकलनानिमित्त काम करणाऱ्या शर्मा यांना मोहल्यातील काही युवकांकडून वारंवार धमक्या दिल्या होत्या. स्थानिक पोलिस ठाण्यात या बाबत तक्रारही दाखल झाली होती. परंतू दिल्ली पोलिसांनी संबंधितांविरूद्ध कारवाई केली नसल्याचे या शिष्टमंडळाने या वेळी सांगितले.
स्थानिक पोलिस प्रशासन यातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप या वेळी केला. शर्मा यांच्या हत्येतील दोषी तसेच गुंतलेल्यांना फाशी द्यावी, अन्य हल्लेखोरांविरूद्ध रासुका अंतर्गत कारवाई करावी, फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा, शर्मा कुटूंबियातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, असे या शिष्टमंडळाने या निवेदनामध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक ?
- आता पदव्यूत्तर विभागाचे अभ्यासक्रम एकसमान राहणार
- तीन वाहने फोडून लॅपटॉप लांबवला
- पोलिसांचा नाकर्तेपणा की मंत्र्यांना मुभा, कोरोनाचे नियम फक्त शिवजयंतीलाच का?
- देशभक्त आणि देशद्रोही मधील फरक मोदींना समजत नाही : प्रियांका गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
