औरंंगाबाद : जिन्सी परिसरातील अॅपेक्स हॉस्पीटल जवळ चोरट्यांनी धुमाकुळ घालत तीन वाहनांच्या काचा फोडून एका वाहनातील लॅपटॉप चोरून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
स्वराज संजय भुतडा (वय २९, रा.गोल्डको सोसायटी, आयवरी स्टेट, वाणेर पुणे, ह.मु.जिंतूर, परभणी) हे काही कामानिमित्ताने औरंगाबादला आले होते. त्यावेळी त्यांनी आपली कार क्रमांक (एमएच-२०-डीजे-४१७४) अॅपेक्स हॉस्पीटल समोरील रोडवर उभी केली होती. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने भुतडा यांच्या कारची काच फोडून पाठीमागील सिटवर ठेवलेला ३५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप चोरून नेला.
दरम्यान, चोरट्याने भुतडा यांच्या कारजवळ उभ्या असलेल्या कार क्रमांक (एमएच-२०-ईजी-४८९९) व खासगी बस क्रमांक (एमएच-२०-डीटी-०३०७) या वाहनांच्या काचा फोडून देखील नुकसान केले.
याप्रकरणी स्वराज भुतडा यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारची काच फोडून लॅपटॉप चोरून नेणाऱ्या चोरट्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार शहाणे करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांच्या खास मागणीस्तव, स्मार्ट सिटी बस आता नाईक नगर पर्यंत धावणार
- कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला आजपासून सुरुवात
- कोरोनाचा संसर्ग वाढतोय ! अजित पवारांनी दिले कठोर पाऊल उचलण्याचे संकेत
- इच्छुक उमेदवारांची वॉर्डा-वॉर्डातल्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेत धाव
- दुख:दायक! लग्नाला जाणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

